संपादकीय

चले जाव! छोडो भारत !!

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

चले जाव भारत छोडो अशी घोषणा गवालिया टँकवर (आझाद मैदान)वर महात्मा गांधींनी दिली.या गोष्टीला 75 वर्षे पूर्ण झाली.8 ऑगस्ट 1917 आपण देशभर यांची आठवण केली उजाळा दिला. इंग्रजांना अंतिम इशारा होता.चले जाव! छोडो भारत! इंग्रज तर गेले.आज कुणाला म्हणायचं चले जाव! छोडो भारत ! इंग्रजांनी फोडा व झोडा ही नीती वापरली त्यासाठी हिंदू-मुस्लिम असा संघर्ष निर्माण केला.आज आम्ही स्वतंत्र आहोत.प्रतिज्ञा म्हणतो,आम्ही सारे भारतीय आहोत.निवडणुका,उमेदवारीची निवड इत्यादी अनेक बाबीत जात महत्त्वाची असते.जात धर्म हीच योग्यता, जात-धर्म हीच ओळख. जाती-धर्मात हा देश विभागलाय. इंग्रजांनी स्वार्थासाठी जातीय संघर्ष निर्माण केला.आज राजकारणी तेच करत आहेत. कर्मवीर भाऊराव पाटील,पंजाबराव देशमुख,महर्षी कर्वे, बापुजी साळुंखे यांनी बहुजनविकासासाठी शाळा- महाविद्यालये काढली.आज शिक्षण सम्राट,साखर सम्राट निर्माण झाले आहेत.इथे सहकार सम्राटांच राज्य होते.त्यांनी सहकार मोडून त्यावर स्वमालकी निर्माण केली.सहकारी साखर कारखाने घराणेशाहीने स्व मालकीचे झाले आहेत.हे कारखाने शेतकऱ्यांच्या शोषणाचे अड्डे बनले आहेत.उसाचे योग्य वजन होत नाही.आता कुणा कुणाला म्हणायचे? छोडो भारत! चले जाव! पारतंत्र्यात त्याग,बलिदान,आत्माहुती,हौतात्म्य हेच पुण्य होते. आज शेतकरी आत्महत्या करतोय,कर्जमाफीचे गाजर दाखवले जातय ,पैसा दिल्याशिवाय काम होत नाहीत.पैसा खाणे हा नोकरशाहीचा धर्म बनला आहे. भ्रष्टाचाराने देश किडला आहे,सडला आहे.अरुणा असफअली,मादाम कामा,ऍनी बेझंट,सरोजनी नायडू,लक्ष्मी सहगल या स्त्रियांनी देशासाठी संघर्षं केला.अहिल्या रांगणेकर (रणदिवे) यांनी शिक्षण सोडून 42च्या लढ्यात उडी घेतली.गोदावरी परुळेकरांनी आदिवासी वेठबिगारी विरुद्ध संघर्ष केला.आज बाप चेअरमन,पत्नी व्हाइस चेअरमन,मुलगा सेक्रेटरी,सून कार्याध्यक्ष,मुले नातवंडे कार्यकारी मंडळाचे सदस्य दिसतात.आज गर्व से कहो हम...है,वंदे मातरम कहना होगा,नाहीं तो देश छोड़ना होगा 25 कोटी मुस्लिम कुठे जातील?भारतातच पुन्हा वेगळा पाकिस्तान निर्माण होईल,दुर्बिणीतून भारत शोधावा लागेल.कुना कुणाला म्हणायचे? छोडो भारत!चले जाव!! शिल्लक मोजावी लागेल. प्रा.विजयकुमार जोखे (मो.9405586558)

चले जाव! छोडो भारत !!
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *