मुंबई

राष्ट्रवादीने केली पहिली यादी जाहीर; कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांना उमेदवारी

प्रतिनिधी
Mar 14 / 2019

मुंबई- राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभा निवडणुकीसाठी गुरुवारी पहिली यादी जाहीर केली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन ही यादी जाहीर केली. राष्ट्रवादीच्या पहिल्या यादीत 10 उमेदवारांचा समावेश आहे. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यात आली आहे. जयंत पाटील यांनी सांगितले की, हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी पक्षाला देण्यात अाली आहे. पुढील यादी लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. रायगड - सुनील तटकरे, बारामती - सुप्रीया सुळे, सातारा - उदयनराजे भोसले, कोल्हापूर - धनंजय महाडीक, बुलढाणा - राजेंद्र शिंगणे, परभणी - राजेश विटेकर, जळगाव - गुलाबराव देवकर, ठाणे - आनंद परांजपे, मुंबई उत्तर पूर्व - संजय दिना पाटील, कल्याण- बाबाजी पाटील.

राष्ट्रवादीने केली पहिली यादी जाहीर; कोल्हापुरातून धनंजय महाडिक यांना उमेदवारी
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *