कोंकण

रत्नागिरी तालुक्यातील कूवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीत गावविकास आघाडी रिंगणात

प्रतिनिधी
Mar 14 / 2019

रत्नागिरी प्रतिनिधी:- रत्नागिरी तालुक्यातील कुवारबाव गावात अनेक प्रश्न आजही प्रलंबीत राहिले आहेत. पाणी पुरवठा, रस्ते, गटारे, बिल्डींग परवाने, सार्वजनिक स्वच्छता, स्मशानभुमिची उभारणी आदी प्रश्न प्रलंबित राहिल्या कारणाने शिवसेनेच्या विरोधात गाव विकास आघाडी तयार करण्यात आली आहे. येत्या 24 मार्च रोजी होणा-या कुवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये गाव विकास आघाडी मैदानात उतरली असून सरपंच पदासहित सर्वच्या सर्व जागांवर उमेदवार विजयी करणार असा निश्चय केला असल्याची माहिती आघाडीतील भारतीय जनता पक्षाच्या शक्तीकेंद्र प्रमुख सतेज नलावडे यांनी दिली आहे. कुवारबाव ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गाव विकास आघाडीच्या वतीने संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी गाव विकास समितीने आपली या निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका मांडली. यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष महेंद्र नागवेकर, राष्ट्रवादीचे नेते उमेश शेट्ये, कुमार शेट्ये, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष सुदेश मयेकर, सामाजिक कार्यकर्ते सी.ए.जाधव, साईनगर येथील राजन आयरे, सरपंच पदाच्या उमेदवार सौ. मंजिरी पाडाळकर, महेश मयेकर, भाजपा नगरसेवक सुशांत चवंडे, राष्ट्रवादी युवक तालुकाध्यक्ष सिद्धेश शिवलकर, जिल्हा सरचिटणीस बबलू कोतवडेकर, कॉंग्रेस विधानसभा क्षेत्र समन्वयक कपिल नागवेकर, महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे उपतालुकाध्यक्ष गुरुनाथ चव्हाण आदी उपस्थित होते. यावेळी सतेज नलावडे म्हणाले की कुवरबाव गावातील नळपाणी योजना थकित आहे. या योजनेमध्ये फार मोठा घोटाळा आहे. अनेकांना पाणीटंचाईच्या भीषण समस्येला सामोरे जावे लागत आहे. काही बिल्डर्सना घरपट्टी माफ करण्यात आली आहे. निवारा शेड बाबतच्या प्रकरणामध्ये आमदार उदय सामंत यांनी मध्यस्ती केली. गावात स्मशानभूमिची समस्या आहे. यामुळेच येथील ग्रामस्थ संतप्त झाले आहेत. अशी माहिती राष्ट्रवादी नेते कुमार शेट्ये यांनी दिली.

रत्नागिरी तालुक्यातील कूवारबाव ग्रामपंचायत निवडणुकीत गावविकास आघाडी रिंगणात
Categories : कोंकण Tags : कोंकण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *