कोंकण

बनावट कागदपत्रे बनवून लांजातील पतसंस्थेला घातला तब्बल 28 लाखांचा गंडा

प्रतिनिधी
Mar 14 / 2019

लांजा प्रतिनिधी:- लांजा तालुक्यातील मराठा नागरी सहकारी पतसंस्थेमधिल कर्मचारी आणि पिग्मी एजंट यांनी बनावट कागदपत्रे बनवून तब्बल 28 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना घडली आहे. यासंदर्भात गुरुवारी पहाटे बारा वाजण्याच्या सुमारास लांजा पोलिस स्थानकात नोंद करुन त्या पिग्मी एजंट आणि तात्कालिन कर्मचा-यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर घटनेची हकीकत अशी की घटनेतील फिर्यादी विवेक शिवाजीराव सावंत हे मराठा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादीत लांजाचे संचालक असून यातील आरोपी मृणालिनी आयरे या पिग्मी एजंट असून दुसरे आरोपी हनूमंत मोरे हे पतसंस्थेचे तात्कालिन कर्मचारी आहेत. या दोन्ही आरोपींनी आपल्या हुद्द्याचा गैरफायदा घेवून जाणिवपूर्वक खोटे व बनावट कागदपत्रे बनवून पैशाची अफरातफर करुन पिग्मी पुस्तकात खाडाखोड करुन, काही पुस्तके बनावट बनवून पतसंस्थेचे 28 लाख रुपयांचे आर्थिक नुकसान व फसवणूक केली आहे. हा प्रकार सन 2013 ते 2017 या कालावधीत घडला असल्याची माहिती फिर्यादी विवेक शिवाजीराव सावंत यांनी दिली आहे. म्हणुन फिर्यादी सावंत यांनी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी सो वर्ग 1 लांजा यांचे कोर्टात फौजदारी किरकोळ अर्ज नंबर 1/19 अन्वये दाखल करुन मा. न्यायालयाचे आदेशान्वये सी.आर.पी.सी.153(3) प्रमाणे रिपोर्ट मागविला असल्याने वरिल प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदर घटनेतील आरोपींवर लांजा पोलिस स्थानकात गुन्हा रजिस्टर नंबर 25/2019 च्या भा.द.वि. कलम 420, 23, 120(ब), 403, 406, 415, 417, 465, 471 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बनावट कागदपत्रे बनवून लांजातील पतसंस्थेला घातला तब्बल 28 लाखांचा गंडा
Categories : कोंकण Tags : कोंकण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *