थोडक्यात महत्वाचे

विप्रोचे सर्वेसर्वा अजीम प्रेमजी यांनी केले 52,750 कोटी रुपये दान

प्रतिनिधी
Mar 14 / 2019

नवी दिल्ली : प्रसिद्द आयटी कंपनी विप्रोचे मालक अजीम प्रेमजी यांनी तब्बल 52,750 कोटी रुपयांचे शेअर अजीम प्रेमजी फाउंडेशनला दान केले आहेत. प्रेमजी यांच्या शेअर्समुळे होणाऱ्या आर्थिक लाभाचा वापर फाउंडेशनच्या कामासाठी केला जाणार आहे. अजीम प्रेमजी फाउंडेशनने म्हटलं की, अजीम प्रेमजी यानी आपली जास्तीत जास्त संपत्ती दान करुन समाजाप्रती असलेली आपली जबाबदारी वाढवली आहे. अजीम प्रेमजी फाउंडेशनने बंगळुरुत प्रेमजी विद्यापीठाची स्थापना केली आहे. गुणवतं विद्यार्थी घडवणे हा या विद्यापीठाचा उद्देश आहे. शिक्षणाच्या कार्याला वेग मिळावा यासाठी प्रेमजींनी मोठी दान केली आहे.

विप्रोचे सर्वेसर्वा अजीम प्रेमजी यांनी केले 52,750 कोटी रुपये दान
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *