हटके

ओप्पो लाँच करणार १० एक्स ऑप्टीकल झूम कॅमेरा असलेला स्मार्टफोन

प्रतिनिधी
Mar 14 / 2019

स्मार्टफोन ओप्पो या चीनी उत्पादक कंपनी ने इनोव्हेशन इव्हेंट २०१९ मध्ये १० एक्स ऑप्टीकल झूम कॅमेरा असलेला स्मार्टफोन सादर होण्याचे संकेत दिले असून या फोनचे नामकरण ओप्पो रेनो असे केले गेले आहे. या फोनची चर्चा बराच काळ सुरु आहे आणि तो मोबाईल वर्ल्ड कॉंग्रेस मध्येच लाँच केला जाईल असा अंदाज यापूर्वी वर्तविला गेला होता. या फोनसाठी नवीन कॅमेरा तंत्र वापरले गेले आहे. त्यात पेरीस्कोपप्रमाणे ट्रिपल कॅमेरा सेटअप रिअरला असेल. त्यातील प्रायमरी कॅमेरा ४८ एमपी, दुसरा १२० डिग्री वाईड अँगल तर सर्वात खालचा टेलीफोटो लेन्स कॅमेरा असेल. अन्य फिचरमध्ये ५ जी नेटवर्क सपोर्ट, फुल एचडी प्लस डिस्प्ले, ८ जीबी रॅम, २५६ जीबी स्टोरेज, इनडिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर असतील.

ओप्पो लाँच करणार १० एक्स ऑप्टीकल झूम कॅमेरा असलेला स्मार्टफोन
Categories : हटके Tags : हटके
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *