कोल्हापूर

कुंटणखाण्याच्या मालकीणीस एक दिवसाची पोलीस कोठडी

प्रतिनिधी
Mar 14 / 2019

गांधीनगर (प्रतिनिधी) : उचगाव ( ता. करवीर ) येथील कुंटणखान्याची मालकीण शोभा परशराम साळोखे ( वय 51, रा . रेडेकर गल्ली, उचगाव ) हिला प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी सी. एस. देशपांडे यांनी एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली . उचगाव येथील रेडेकर गल्लीत साळोखे कुंटणखाना चालवत होती. मंगळवारी स्थानिक गुन्हे अन्वेषण व अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाने या कुंटणखान्यावर छापा टाकला. त्यावेळी साळोखेस अटक करून तीन पीडित महिलांची सुटका केली. पोलीस निरीक्षक तानाजी सावंत , सहाय्यक निरीक्षक प्रियांका शेळके व त्याच्या पथकाने छापा टाकला. गांधीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता .

कुंटणखाण्याच्या मालकीणीस एक दिवसाची पोलीस कोठडी
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *