कोल्हापूर

विजेच्या धक्क्याने वसगडेत एकाचा मृत्यू

प्रतिनिधी
Mar 14 / 2019

गांधीनगर ( प्रतिनिधी ) पाण्याची मोटार नदीत सोडताना विजेचा धक्का बसून सुनील बाळासाहेब वाडकर ( वय ३८ रा. वसगडे ता. करवीर ) यांचा मृत्यू झाला. बुधवारी सायंकाळी ५ दरम्यान वसगडे येथे हा प्रकार झाला . याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी : सायंकाळी पाच च्या दरम्यान सुनील सह आणखी पाच जण नदीत मोटार सोडण्याचे काम करत होते . ते करत असताना अन्य ऐका मोटारीचा विजेचा धक्का वाडकर यांना बसला . अत्यवस्थ झाल्याने उपचारासाठी त्यांना कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल केले . पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला . सुनील अत्यंत गरीब होते . मन मिळावू स्वभावामुळे अत्यंत अल्पदरात मोटार दुरुस्तीचे सेवा ते बजावत होते त्यांचे वडील पाटकरी म्हणून काम करत होते . त्यांचाच वारसा ते पुढे चालवत होते. सुनील यांच्या मागे आई -वडील ,पत्नी ,तीन मुली व भाऊ-बहिण असा परिवार आहे . सुनील घरातील कर्ता असल्याने व मुली लहान असल्याने ग्रामस्थांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे . रात्री-अपरात्री कोणीही मोटर दुरुस्तीसाठी बोलावले तर सुनील ताबडतोब जायचे त्यामुळे वसगडेत आपला माणूस अशी त्यांची ओळख होती . याबाबतची फिर्याद बाबुराव बाळासाहेब वाडकर यांनी दिली .

विजेच्या धक्क्याने वसगडेत एकाचा मृत्यू
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *