कोंकण

शिवसेनेचेच मंत्री रिफायनरी प्रकल्प आणतात आणि रद्द झाल्यानंतर पेढेदेखील भरवतात?

प्रतिनिधी
Mar 14 / 2019

रत्नागिरी प्रतिनिधी:- रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार गावात रिफायनरी प्रकल्प येऊ घातला होता. मात्र हा प्रकल्प शिवसेनेचे मंत्री सुभाष देशमुख यांनी आणण्याचा घाट घातला होता. त्यानंतर नुकत्याच काही दिवसांपुर्वी नाणार रिफायनरी प्रकल्प रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फ़डणवीस यांनी केली. त्यानंतर लगेचच खासदार विनायक राऊत आणि कोकणच्या सर्व आमदारांनी प्रकल्प रद्द झाल्याबद्दल पेढे भरवून आनंद व्यक्त केला होता. अशा या दुटप्पी भूमिका बजावणा-या शिवसेनेला तुम्ही मतदान करुन विजयी करुन देणार काय? अशी खरमरीत टीका रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघाचे संभाव्य उमेदवार नविनचंद्र बांदीवडेकर यांनी लांजा येथील कार्यकर्ता मेळाव्यात केली. लांजा तालुका कॉंग्रेस कमिटिच्या वतीने मंगळवारी कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नविनचंद्र बांदीवडेकर व्यासपिठावरुन बोलत होते. यावेळी राजापूरच्या विधान परिषद आमदार सौ. हुस्नबानू खलिफे, नवी मुंबई महानगर पालिकेचे माजी उपमहापौर अविनाश लाड, लांजा तालुका कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, कॉंग्रेस अनुसूचित जाती व जमतीचे जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, महिला कॉंग्रेस तालुकाध्यक्षा श्रीमती धनिता चव्हाण, श्रीमती सुचित्रा चव्हाण, सयजिन टोले, महेश सप्रे, संजय

शिवसेनेचेच मंत्री रिफायनरी प्रकल्प आणतात आणि रद्द झाल्यानंतर पेढेदेखील भरवतात?
Categories : कोंकण Tags : कोंकण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *