महत्वाच्या घडामोडी

महामंडळ नियुक्ती मध्ये भाजपाची सरशी

प्रतिनिधी
Mar 14 / 2019

कोल्हापूर ( राजेंद्र मकोटे ) . -सतराव्या लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता घोषित होण्याच्या अंतिम चरणात , प्रशासकीय कसरत पुर्ण करून , कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल आठ महामंडळावर आपल्या पदाधिकारी - कार्यकर्त्याची वर्णी लावण्यात अखेर भारतीय जनता पक्षाने बाजी मारली आहे , या मध्ये पालकमंत्री - भाजपा नेते चंदकात दादा पाटील यांनी आपले सर्व कौशल्य पणास लावत बाजी मारली आहे . कोल्हापूर शहरासह खानापूर - गारगोटी आणि रुकडी - इचलकंरजी परिसरात आपल्या समर्थक सहकारी वर्गासमावेत सक्रीय असणाऱ्या या आठ नवनियुक्त महामंडळ सदस्यामुळे , घोषित लोकसभा आणि त्या पाठोपाठ येण्याऱ्या विधानसभा सह महानगर पालिका निवडणूकीत ही यांचा निश्चितच भाजपा स फायदा होणार आहे . या तुलनेत शिवसेनेच्या फक्त दोघानाच सध्यातरी संधी मिळाली आहे , आणि ही संख्यात्मक तुलना होताना , नेहमी रस्त्यावरील आंदोलनात सक्रीय असलेल्या शिवसैनिकात थोडीफार नाराजी येणे ही स्वाभाविक आहे . एका बाजुला राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे चंद्रकात दादा पाटील यांच्या रूपातील भाजपाचे दमदार नेतृत्व आणि या तुलनेत , जिल्ह्यात निम्मे हून अधिक आमदार असूनही , त्यांच्यातील नेमक्या समन्वया अभावी , तीन - चार वेळा संधी येऊनही न मिळालले मंत्री पद , आणि शहरात आमदार व जिल्हाप्रमुख गटात वेळोवेळी जाहीरपणे व्यक्त झालेले मतभेद वा मुळे ही शिवसैनिकात बैचेनी वाढणे स्वाभाविकच आहे , आणि आठ च्या तुलनेत दोन या महामंडळ नियुक्ती समीकरणाने ती अधिकच वाढणे स्वाभाविकच आहे ., यांचा आगामी निवडणूका सह पक्ष वाढीमध्ये प्रतिकुल परिनाम होऊ नये , यासाठी स्थानिक गटबाजीस सोईस्कर खतपाणी न घालता , सक्रीय शिवसैनिक पदाधिकारी वर्गास वेळीच योग्य संधी देणेसाठी शिवसेना वरिष्ठ नेते नेतृत्वाने वेळ देत , खूप ऊशिर होण्यापुर्वीच लक्ष घालणे गरजेचे च आहे . या सह राष्ट्रीय समाज पक्ष सह इतर घटकपक्षीय कार्यकर्त्यानाही संधी देत , त्यांनाही निवडणूकीत सक्रिय ठेवणेसाठी भाजपा - शिवसेनेच्या नेते मंडळीनी होकारात्मक व सर्वसमावेशक धोरण स्विकारणे हे ही कोल्हापूर जिल्ह्यातील बेरजेच्या राजकाणात निकडीचे आहे .

महामंडळ नियुक्ती मध्ये भाजपाची सरशी
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *