कोल्हापूर

बेकायदेशीर हत्यार विक्री करणारा जेरबंद : 11 तलवारी जप्त

प्रतिनिधी
Mar 13 / 2019

कोल्हापूर : लक्ष्मीपुरी कोंबडी बझार येथील ओम एटरप्रायजेस नांवाचे दुकानात विक्री करणेसाठी बेकायदेशीर हत्यारे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाली त्यानुसार पोलीस निरीक्षक तानाजी सावंत याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने  हत्यारांवर पाळत ठेवली. त्यानंतर मंगळवारी (दि.१२)रोजी शाखेकडील पोलीस उप निरीक्षक सचिन पंडीत, पोलीस उप निरीक्षक दादाराजे पवार, सहा. फौजदार मोहन पाटील, सहा. फौजदार सुरेश चव्हाण, पोलीस हावलदार गुलाब चौगले,अनमोल पवार, रमेश डोईफोडे, प्रकाश संकपाळ, वसंत पन्हाळकर असेनी त्याचे दुकानाचे दारात छापा टाकला. यावेळी दुकान मालक अमरजितसिंग महेंदरसिंग खनुजा (रा. जुना वाशी नाका, ७८७, ए वॉर्ड, शिवाजी पेठ) याचेकडून १६ हजार २०० रूपयांच्या ११ तलवारी व तलवारी विक्री करून मिळालेली १ हजार २०० रूपये असा एकूण १७ हजार ४०० रूपये किंमतीची बेकायदेशीर हत्यारे व रोख रक्कम जप्त केली. खनुजा याच्या विरोधात यापुर्वी लक्ष्मीपुरी, जुना राजवाडा व हुपरी पोलीस ठाणेमध्ये शस्त्रास्त्रासंबधीचे गुन्हे दाखल आहेत.

बेकायदेशीर हत्यार विक्री करणारा जेरबंद : 11 तलवारी जप्त
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *