कोल्हापूर

पंचगंगा रुग्णालयास रोटरी क्लब तर्फे चार डबल फोटोथेरेपी प्रदान

प्रतिनिधी
Mar 13 / 2019

कोल्हापूर ता. 13 :कोल्हापूर महानगरपालिका पंचगंगा रुग्णालयास चार डबल सरफेस फोटोथेरेपी रक्कम रु. 2,40,000/- चे मशिन रोटरी क्लब कोल्हापूर सिटी यांच्या वतीने रुग्णालयास देण्यात आले. हे मशिन रोटरी क्लबचे जिल्हा गर्व्हनर रविकिरण कुलकर्णी यांच्या हस्ते पंचगंगा रुग्णालयास प्रधान करणेत आले. या मशिनचा उपयोग लहान बाळांना कावीळ झाल्यानंतर कावीळ कमी करण्यासाठी होतो. पंचगंगा रुग्णालयामध्ये या फोटोथेरेपी मशिनची सुविधा सर्वांसाठी विनामुल्य देण्यात येणार आहे. रोटरी क्लब कोल्हापूर यांनी यापूर्वीही पंचगंगा रुग्णालयास फ्रिज प्रधान केला आहे. यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष सचिन पाटील, प्रशासकीय वैद्यकिय अधिकारी डॉ. विद्या हेरवाडे बालरोग तज्ञ डॉ. राजेश औंधकर डॉ. सचिन जाधव, नितीन मिरजे, सिस्टर विद्या भोसले, पंचगंगा रुग्णालयातील सर्व स्टाफ उपस्थित होता.

पंचगंगा रुग्णालयास रोटरी क्लब तर्फे चार डबल फोटोथेरेपी प्रदान
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *