थोडक्यात महत्वाचे

चंद्रपूर येथे थकित वेतनाच्या मागणीसाठी जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता कामगारांचे पालकमंत्र्यांच्या घरापुढे उपोषण

प्रतिनिधी
Mar 13 / 2019

चंद्रपूर प्रतिनिधी:-गेल्या तीन दिवसांपासून थकित वेतनाच्या मागणीसाठी उपोषण करणा-या जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता कामगारांनी आज थेट पालकमंत्र्यांच्या घरापुढे ठिय्या दिला. अनपेक्षितपणे केलेल्या या आंदोलनानं पोलिस प्रशासनाची चांगलीच भंबेरी उडाली. जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता कामगारांचं वेतन मागील चार महिन्यांपासून थकित आहे. शिवाय किमान वेतन कायद्यानुसार वेतन द्यावं, या मागणीसाठी सुमारे तीनशेवर स्वच्छता कामगार जटपुरा गेटजवळ मागील तीन दिवसांपासून उपोषणावर बसले आहेत. तहानभूक विसरून न्यायासाठी बसलेल्या या कामगारांना पोलिस सुरक्षा तर सोडा, त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी डॉक्टरसुद्धा पाठवले जात नाहीत. त्यामुळं आज जनविकास अंसघटीत कामगार संघटनेचे प्रमुख पप्पू देशमुख यांनी या कामगारांना घेऊन पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नवीन घरापुढे ठिय्या मांडला. तेव्हा अवघ्या पाच मिनिटात पोलिस दाखल झाले आणि त्यांनी कामगारांना उचललं. म्हणजे पोलिस किंवा जिल्हा प्रशासनाला कामगारांची पर्वा नाही, तर पालकमंत्र्याची काळजी वाटते, हे दाखवून देण्यासाठी हे आंदोलन करावं लागण्याची वेळ आंदोलकांवर आली. 

चंद्रपूर येथे थकित वेतनाच्या मागणीसाठी जिल्हा रुग्णालयातील स्वच्छता कामगारांचे पालकमंत्र्यांच्या घरापुढे उपोषण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *