कोंकण

रत्नागिरी तालुक्यातील मनरेगा योजनेतून फळबाग लागवडीच्या कार्यक्रमात विक्रमी कामगिरी

प्रतिनिधी
Mar 13 / 2019

रत्नागिरी प्रतिनिधी:- महात्मा गांधी रोजगार हमी योजना (मनरेगा) अंतर्गत रत्नागिरी तालुक्यातील फळबाग लागवडीच्या कार्यक्रमात विक्रमी कामगिरी झालेली असल्याचे दिसून येत आहे. रत्नागिरी पंचायत समितीमधून मिळालेल्या आकडेवारिनुसार सन 2017-18 सालात 12065 मनुष्यदिन निर्मितीचे ऊद्दीष्ट दिले होते. त्यापैकी 41363 एवढे ऊद्दीष्ट साध्य झाले. सन 2018-19 साठी 34889 एवढे मनुष्यदिन निर्मितीचे ऊद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यापैकी 79041 एवढे साध्य झाले आहे. या कार्यक्रामध्ये 2017-18 या आर्थिक वर्षात अकुशल कामगारांसाठी 8460205 रुपये व कुशल कामगारांसाठी 1236681 रुपये एवढी रक्कम खर्ची करण्यात आली आहे. तसेच 2018-19 या आर्थीक वर्षासाठी आत्तापर्यंत अकुशल कामगारांसाठी 15082795 रुपये तर कुशल कामगारांसाठी 1286213 रुपये खर्ची करण्यात आली आहे.

रत्नागिरी तालुक्यातील मनरेगा योजनेतून फळबाग लागवडीच्या कार्यक्रमात विक्रमी कामगिरी
Categories : कोंकण Tags : कोंकण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *