थोडक्यात महत्वाचे

चंद्रपूर शहरातील दाताळा मार्ग रामनगर परिसरात विवाहीतेची आत्महत्या, घरातच गळफास लावून घेत आत्महत्या

प्रतिनिधी
Mar 12 / 2019

चंद्रपूर प्रतिनिधी:- शहरातील दाताळा मार्ग रामनगर परिसरात विवाहीतेची आत्महत्या, घरातच गळफास लावून घेत आत्महत्या, गायत्री घोडे (35) असे आहे मृत महिलेचे नाव, 10 लाख रु. हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केल्याचा महिलेच्या माहेरच्यांचा आरोप अँकर :- चंद्रपूर शहरातील रामनगर परिसरात आज सकाळी एका ३५ वर्षीय विवाहित महिलेने आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. दाताळा मार्ग परिसरात असलेल्या घरातच गळफास लावलेल्या अवस्थेत या महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. गायत्री घोडे असे आहे मृत महिलेचे नाव असून मागच्या वर्षीच एप्रिल २०१८ मध्ये तिचा चंदन घोडे याच्या सोबत विवाह झाला होता. चंदन घोडे हा एका चारचाकी वाहनाच्या शोरुम मध्ये मॅनेजर असून त्याचा पहिल्या पत्नीपासून घटस्फोट झाला आहे. घटस्फोट झाल्यानंतर त्याने गायत्री सोबत पुनर्विवाह केला होता मात्र तो आणि त्याचे कुटुंबीय गायत्रीचा सतत शारीरिक आणि मानसिक छळ करीत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. गायत्रीचा 10 लाख रु. हुंड्यासाठी सासरच्यांनी छळ केल्याचा आणि त्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचा आरोप तिच्या माहेरच्या लोकांनी केला आहे. या संबंधी रामनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.

चंद्रपूर शहरातील दाताळा मार्ग रामनगर परिसरात विवाहीतेची आत्महत्या, घरातच गळफास लावून घेत आत्महत्या
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *