मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

प्रतिनिधी
Mar 11 / 2019

मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहे. यामध्ये बीए, बीकॉम अभ्यासक्रमाच्या परीक्षांचा समावेश आहे. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने याबाबत माहिती दिली आहे. बीए, बीकॉम अभ्यासक्रमाच्या 22 एप्रिल, 23 एप्रिल आणि 24 एप्रिल, त्यासोबतच 29 एप्रिल आणि 30 एप्रिल यादिवशी येणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे. परीक्षेचं बदलेलं वेळापत्रक लवकरच मुंबई विद्यापीठाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येईल, असं परीक्षा विभागाकडून सांगण्यात आलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *