पुणे

माढा मतदार संघातून शरद पवार यांची माघार.

प्रतिनिधी
Mar 11 / 2019

पुणे - अखेर माढा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी लोकसभा लढवणार नसल्याचे जाहीर केले आहे. कौटुंबिक पातळीवर आपण हा निर्णय घेत आहोत असे सांगण्यात आले आहे. कुटुंबातही आपण चर्चा केली. यानंतर स्वतः उभे न राहता पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे हे निवडणूक लढवतील असे ठरवले. नव्या पिढीला संधी द्यावी हा माझा मानस आहे. सोबतच, एका निवडणुकीला एकाच कुटुंबातील किती लोकांनी उभे रहावे याला काही मर्यादा असाव्यात असे मला वाटते त्यामुळे मी ही निवडणूक नाही लढवण्याचा निर्णय घेतला आहे असेही शरद पवार म्हणाले आहेत.

माढा मतदार संघातून शरद पवार यांची माघार.
Categories : पुणे Tags : पुणे
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *