कोंकण

डॉ. सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून घेऊन येत आहेत एक प्रसन्न चित्रपट वेडिंगचा शिनेमा

प्रतिनिधी
Mar 11 / 2019

रत्नागिरी प्रतिनिधी:- गेली जवळजवळ वीस वर्ष गायक, संगीतकार, लेखक, परीक्षक, मधली सुट्टी सारख्या कार्यक्रमाचा संकल्पनाकार अश्या विविध भूमिकांमधून रसिकांना आनंद देणारा डॉ. सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून वेडिंगचा शिनेमा हा चित्रपट घेऊन आपल्यासमोर येत आहेत. या चित्रपटात प्रमुख भुमिकेमध्ये मुक्ता बर्वे, भाऊ कदम, शिवाजी साटम, अलका कुबल, सुनील बर्वे, अश्विनी काळसेकर, प्रवीण तरडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता हणमगर, योगिनी पोफळे या आघाडीच्या कलाकारांबरोबर शिवराज वायचळ आणि ऋचा इनामदार ही नवोदित जोडी झळकणार आहेत. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद, संगीत आणि दिग्दर्शन सलील कुलकर्णी यांचे असून वेडिंगचा शिनेमा हा एक निखळ आनंद देणारा एक प्रसन्न अनुभव असणार आहे. हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात १२ एप्रिल २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.

डॉ. सलील कुलकर्णी आता लेखक आणि दिग्दर्शक म्हणून घेऊन येत आहेत एक प्रसन्न चित्रपट वेडिंगचा शिनेमा
Categories : कोंकण Tags : कोंकण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *