सांगली

पश्चिम भारतात विटा शहराचा प्रथम क्रमांक

प्रतिनिधी
Mar 06 / 2019

विटा /प्रतिनिधी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०१९ मध्ये विटा नगरपरिषदेने उल्लेखनीय यश संपादन करत पश्चिम भारतात ५ राज्यांमध्ये २५हजार ते ५० हजार लोकसंख्या असणाऱ्या नगरपालिका गटात पहिला क्रमांक मिळवला. तसेच स्वच्छ शहराच्या क्रमवारी मध्ये सर्वसाधारण नगरपालिका गटात भारतामध्ये विटा शहराने चौथ्या क्रमांकाचे पटकावला आहे. दिल्ली येथे केंद्रीय नगरविकासमंत्री हरदीप एस पुरी यांच्या हस्ते व सेक्रेटरी नगरविकास केंद्र सरकार दुर्गा शंकर मिश्रा यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार विटा नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, नगराध्यक्षा सौ.प्रतिभा पाटील, उपनगराध्यक्ष दहावीर शितोळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, आरोग्य सभापती अँड विजय जाधव यांना वितरण करण्यात आला. विटा शहराने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये चमकदार व दमदार कामगीरी करत देशपातळीवर स्वच्छ शहर म्हणून झेंडा फडकवला आहे. यामुळे विटेकरांची छाती अभिमानाने फुलली आहे. घनकचरा व्यवस्थापन, कचरा विलगीकरण, हगणदारीमुक्त शहर, प्लास्टिकमुक्त, कचराकुंडीमुक्त, वराहमुक्त, झोपडपट्टी मुक्त शहर तसेच शहरातील सार्वजनिक ठिकाणी सुशोभिकरण, घनकचरा प्रक्रिया प्रकल्प, सेंद्रिय खत, बायोचार, यासोबतच शहरामध्ये नित्य साफसफाई, जनजागृतीसाठी अनेक उपक्रम पालिकेने हाती घेत केलेल्या परिश्रमाचे आणि यामध्ये विटेकर नागरिकांनी घेतलेला हा उत्फूर्त सहभाग यामुळेच हे यश मिळवण्यात पालिकेला यश आले आहे. हा सन्मान सर्व विटेकर नागरिकांचा आहे असे प्रतिपादन अँड वैभव पाटील यांनी केले.

पश्चिम भारतात विटा शहराचा प्रथम क्रमांक
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *