महत्वाच्या घडामोडी

रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या निषेधार्थ धामणी खोरा विकास कृती समितीच्या वतीने कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने

प्रतिनिधी
Feb 26 / 2019

कोल्हापूर जिल्ह्यातील राई ता.राधानगरी येथील गेली १८वर्ष झाले रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या निषेधार्थ आज धामणी खोरा विकास कृती समितीच्या वतीने कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. तर जोपर्यंत धामणी प्रकल्पांचे काम सुरू होत नाही तोपर्यंत धामणी खोऱ्यातील सर्व गावातील शेतकरी व नागरिकांच्या वतीने निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा धामणी खोरा विकास कृती समितीच्या वतीने पत्रकारांशी बोलताना दिला. दरम्यान सदर मागणीचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे राधानगरी, गगनबावडा आणि पन्हाळा तालुक्यातील विस्तारलेल्या ५० ते ६० वाड्या वस्त्यांना वरदान ठरणाऱ्या राई ता.राधानगरी येथील धामणी माध्यम प्रकल्पाचे काम गेली १८ वर्षे विविध कारणांमुळे रखडले आहे.पाण्याअभावी धामणी खोऱ्याचा संर्वागीण विकास खुंटलेला आहे. तर सध्या धामणी खोऱ्यात तीव्र पाणी टंचाई जाणवत आहे. प्रकल्पाच्या अपूर्णावस्थेमुळे धामणी खोऱ्यातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. यापूर्वी धामणी वासीयांनी या प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी लोकशाही पद्धतीने मोर्चा ,आंदोलने अशा विविध मार्गाचा अवलंब करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.मात्र सरकारने याकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष केले असून त्याच्या निषेधार्थ धामणी खोऱ्यातील सर्व गावातील शेतकरी आणि नागरिकांच्या वतीने जोपर्यंत धामणी प्रकल्पाचे काम सुरु होऊन लेखी पत्र मिळत नाही.तोपर्यंत सर्व निवडणूकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तरी यापुढील होणाऱ्या कायदा व सुव्यवस्थेस तसेच नुकसानीस सर्वस्वी सरकार जबाबदार राहील.आंदोलनात धामणी खोऱ्यातील शेतकरी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

रखडलेल्या धामणी मध्यम प्रकल्पाच्या निषेधार्थ धामणी खोरा विकास कृती समितीच्या वतीने कोल्हापूरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *