महत्वाच्या घडामोडी

राजापूर तालुक्यातील सातबारा संगणकीकरणाचे काम पुर्ण; तहसिल कार्यालयाचा जिल्ह्यात सहावा क्रमांक

प्रतिनिधी
Feb 21 / 2019

राजापूर प्रतिनिधी:- शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी एक असलेल्या सातबारा संगणकीकरणाचे कामकाज हे गेली दोन वर्षे राजापूर तालुक्यात युद्धपातळीवर सुरु होते. हे गुरुवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी 100 टक्के पुर्ण झाले असून या कामी राजापूर तहसिल कार्यालयाला जिल्ह्यात सहावा क्रमांक प्राप्त झाला आहे. राजापूर तालुक्यातील एकूण तीन लाख अठरा हजार पाचशे पंचवीस एवढे सातबारे ऑनलाईन करण्यात आले आहेत. तालुक्यात सध्या 47 तलाठी सजे, 237 महसूली गावे, 35 तलाठी आणि 7 मंडळ अधिकारी असून रत्नागिरीचे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण व तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्या मार्गदर्शनानुसार ही सातबारा ऑनलाईन करण्याची प्रक्रिया पुर्ण करण्यात आली आहे. अपुरे मनुष्यबळ व तांत्रिक अडचणींवर मात करुन सातबारा संगणकीकरणाचे काम यशस्वीरित्या पूर्ण करित राजापूर तहसिल कार्यालयाने जिल्ह्यात सहावा क्रमांक मिळवला आहे.

राजापूर तालुक्यातील सातबारा संगणकीकरणाचे काम पुर्ण; तहसिल कार्यालयाचा जिल्ह्यात सहावा क्रमांक
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *