महत्वाच्या घडामोडी

हम साथ साथ है, प्रेम रतन धन पायो चे निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन

प्रतिनिधी
Feb 21 / 2019

मुंबई- बॉलिवूड सिनेनिर्माते राजकुमार बडजात्या यांचं आज २१ फेब्रुवारी २०१९ रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. सर एच.एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सिनेविश्लेषक अक्षय राठी यांनी त्यांच्या ट्विट अकाऊंटवर ही दुःखद बातमी शेअर करताना म्हटलं की, राजकुमार बडजात्या यांचं काही वेळापूर्वी निधन झालं. राजश्री प्रोडक्शनचे ते एक भक्कम खांब होते. सिनेमासाठीचं त्यांचं जे प्रेम होतं तसं प्रेम फार कमी लोकांमध्ये दिसतं. हम आपके है कौन, हम साथ साथ है, प्रेम रतन धन पायो, विवाह या अशा इतर गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली होती. चित्रपट निर्मिती क्षेत्रात त्यांनी मोलाचं योगदान दिलं आहे. त्यांच्या जाण्यामुळे कलाविश्वातूनही दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. राजकुमार बडजात्या यांचे वडील ताराचंद बडजात्या यांनी राजश्री प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेची स्थापना केली होती. कौटुंबीक चित्रपटांना महत्त्वं देत अतिशय सुरेख असे चित्रपट आजवर या निर्मिती संस्थेअंतर्गत साकारण्यात आले. १९६० पासून सुरू झालेल्या राजकुमार बडजात्या यांच्या कारकिर्दीत त्यांनी बऱ्याच लोकप्रिय चित्रपटांची निर्मिती केली होती.

हम साथ साथ है, प्रेम रतन धन पायो चे निर्माते राजकुमार बडजात्या यांचं निधन
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *