मुंबई

ट्रायने केबल आणि डीटीएस ग्राहकांना त्यांच्या आवडत्या वाहिन्या निवडण्यासाठीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली

प्रतिनिधी
Feb 13 / 2019

मुंबई: ट्रायच्या नव्या नियमांनुसार तुम्ही तुमच्या आवडीचे टीव्ही चॅनल निवडले नसतील तर काळजी करण्याचं कारण नाही. कारण आवडीचे चॅनल निवडण्यासाठी ट्रायनं 31 मार्चची नवीन डेडलाईन दिलीय. त्यामुळं प्रेक्षकांना जवळपास दीड महिन्यांचा जादा अवधी मिळालाय.नव्या प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी याआधी 1 फेब्रुवारीपर्यंतची मुदत देण्यात आली होती. देशात सुमारे 10 कोटी केबल टीव्ही ग्राहक तर 6.7 कोटी डीटीएच ग्राहक आहेत. केबल सेवेतील 65 टक्के ग्राहक आणि डीटीएचच्या 35 टक्के ग्राहकांनी आपल्या आवडत्या वाहिन्यांची निवड याआधीच केली आहे.

ट्रायने केबल आणि डीटीएस ग्राहकांना त्यांच्या आवडत्या वाहिन्या निवडण्यासाठीची मुदत 31 मार्चपर्यंत वाढवली
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *