पुणे

एसटी महामंडळाने केली शिवशाही बसच्या तिकीट दरात कपात

प्रतिनिधी
Feb 13 / 2019

पुणे - प्रवासी भाड्यात सुमारे २५० ते ५०० रुपयांनी कपात झाल्यामुळे प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा एसटी महामंडळाच्या पुणे विभागातील विभागीय वाहतूक अधिकारी सुनील भोकरे यांनी व्यक्त केली. शिवशाही बसच्या कमी झालेल्या दरांची अंमलबजावणी बुधवारपासून (ता. १३) राज्यभरात सुरू होणार आहे. एसी स्लीपरच्या राज्यातील ४२ मार्गांचा त्यात समावेश आहे. सुमारे २० टक्‍क्‍यांहून अधिक दर कमी झाले आहेत. खासगी बसच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी एसटी महामंडळाने पहिल्यांदाच प्रवासाचे दर कमी करून प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे.

एसटी महामंडळाने केली शिवशाही बसच्या तिकीट दरात कपात
Categories : पुणे Tags : पुणे
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *