मुंबई

राज्यातील सुमारे 28 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांना नियमित मिळणार वाढीव मानधन

प्रतिनिधी
Feb 13 / 2019

मुंबई: राज्यातील सुमारे 28 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांना अनियमितपणे मानधन दिले जाते. गेल्या सहा सप्टेंबर 2014 च्या सुधारित परिपत्रकानुसार सरपंचांना वाढीव मानधन नियमितपणे मिळावे, यासाठी महिला राजसत्ता आंदोलकांनी आवाज उठविला. त्यानंतर ग्रामविकास विभागाचे सचिव विजय शिंदे यांनी वाढीव मानधन नियमितपणे देण्यात येणार असल्याचे सांगितले. मुंबई येथील राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत लोकप्रतिनिधी कारभार परिचय धोरण या विषयावर महिला राजसत्ता आंदोलकांची बैठक झाली. त्यावेळी विजय शिंदे यांनी ही माहिती दिली.जुन्या शासन निर्णयाप्रमाणे ग्रामपंचायत सदस्यांना बैठक भत्ता केवळ 25 रुपये देण्यात येतो. नवीन परिपत्रकानुसार हा भत्ता दोनशे रुपये करण्यात आला. परंतु, त्याची अंमलबजावणी नसल्यामुळे महिला ग्रामपंचायत सदस्य रोजीरोटीला महत्त्व देत बैठकीकडे पाठ फिरवितात. राजकारभारातील महिलांचा सहभाग वाढविण्यासाठी सदस्यांना वाढीवभत्ता द्यावा व सरपंचांनाही बैठकभत्ता देण्याची मागणीही मंजूर करण्यात आली.

राज्यातील सुमारे 28 हजार ग्रामपंचायतींच्या सरपंचांना नियमित मिळणार वाढीव मानधन
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *