पुणे

हेल्मेटसक्तीविरोधात पगड्या घालून पुणेकरांचं आंदोलन

प्रतिनिधी
Jan 03 / 2019

पुणे : हेल्मेटसक्ती विरोधी कृती समितीच्या वतीने पुण्यात आज सविनय कायदेभंग आंदोलन करण्यात येत आहे. हेल्मेटसक्ती कृती विरोधी समिती आणि पुणेकरांनी पोलीस आयुक्तालयावर मोर्चा काढला आहे. हेल्मेट न घालता वेगवेगळ्या पगड्या घालून दुचाकीस्वार आंदोलनात सहभागी झाले आहेत. बंद करा, बंद करा हेल्मेटसक्ती बंद करा, हेल्मेटसक्ती रद्द करावी अशा मागणीचं निवेदन आंदोलक पोलीस आयुक्त के वेंकटेशम यांना देणार आहेत. पत्रकार संघ ते पुणे पोलीस आयुक्तालय अशी ही रॅली आहे. हजारो पुणेकरांवर कारवाई दुसरीकडे पुणेकरांचा हेल्मेटसक्तीला असलेला विरोध झुगारुन पोलिसांनी कडक कारवाई सुरु केली आहे. 1 जानेवारीपासून पुण्यात हेल्मेटसक्ती करण्यात आली आहे. त्यानंतर पहिल्याच दिवशी विना हेल्मेट गाडी चालवणाऱ्या तब्बल 7 हजार 490 जणांवर पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईतून पुणे पोलिसांनी तीन लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला आहे. पुढे ही कारवाई अशीच सुरु राहणार असल्याची माहिती पुणे पोलिसांनी दिली आहे. पुणे पोलिसांच्या कारवाईचा धसका घेत पुणेकरांनी हेल्मेट खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी केली आहे. पुणेकर वाहतुकीच्या इतर नियमांचं पालन करतात तर हेल्मेट वापरण्याला विरोध नसून, सक्तीला विरोध असल्याचं हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच म्हणणं आहे. वाहतुकीच्या इतर नियमांचं पालन पुणेकर करत असून, हेल्मेट सक्तीतून मुक्तता द्यावी, अशी समितीची मागणी आहे.

हेल्मेटसक्तीविरोधात पगड्या घालून पुणेकरांचं आंदोलन
Categories : पुणे Tags : पुणे
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *