पुणे

एक कोटी रूपयांंची लाच स्वीकारणाऱ्या तहसिलदार सचिन डोंगरेच्या घराची आणि बँकेतील लॉकरची झाडाझडती

प्रतिनिधी
Jan 02 / 2019

मोहोळ ( प्रतिनिधी ): मुळशी जि पुणे येथे एक कोटी रूपयाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंध विभागाने सचिन डोंगरे यास पकडल्यानंतर  पुढील तपासासाठी मोहोळ  तालुक्यात आणण्यात आले होते. परंतु तपासात काय आढळले याबाबत माहिती देण्यास संबंधित अधिकाऱ्यांनी नकार दिला.               मुळशी येथे लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात लाच स्वीकारताना अडकलेल्या तहसिलदार सचिन डोंगरे याने सोलापूर जिल्हयात पंढरपूर, सांगोला येथेही काही काळ काम केले आहे.मागील तीन दिवसा पूर्वी पुणे जिल्हयातील मुळशी तहसील येथे कार्यरत असलेले तहसिलदार सचिन डोंगरे, यांने लवळे येथील वाडिलोपार्जित सामायिक इनामी वर्ग शेतजमीनीबाबत निकालपत्र तक्रारदारच्या बाजूने देण्यासाठी लाचेची मागणी केली होती. पुणे ॲन्टी करप्शन विभागाने त्यांना एक कोटी रूपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले होते त्यास दोन जानेवारीपर्यंत  पोलिस कोठडी सुनावन्यात आली होती. तपासाठी त्याच्या पापरी येथील घराची ही झडती घेण्यात आली. मोहोळ शहरात बँक ऑफ इंडीया शाखेत लॉकर आहे. त्या लॉकरची तपासणी सरकारी पंचासमक्ष मंगळवारी सकाळी  करण्यात आली. जवळ जवळ तीन तास बँकेत तपासणी सुरु होती . या तपासात काय काय आढळले याबाबतची माहीती संबंधीत आधिकाऱ्यांना विचारली असता माहीती देण्यास आधिकाऱ्यांनी नकार दिला. यावेळी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस निरिक्षक एस एस घारगे, टिळेकर आदी कर्मचारी पथकामध्ये सहभागी होते .

एक कोटी रूपयांंची लाच स्वीकारणाऱ्या तहसिलदार सचिन डोंगरेच्या घराची आणि बँकेतील लॉकरची झाडाझडती
Categories : पुणे Tags : पुणे
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *