सांगली

विटयात 7 जानेवारीला भारत विरूध्द जॉर्जीया आंतरराष्ट्रीय कुस्तीची महादंगल यंदाचे देशातील सर्वात मोठे मैदान ; डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांची माहिती

प्रतिनिधी
Jan 01 / 2019

विटा / प्रतिनिधी खानापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त 7 जानेवारी रोजी विटयात आंतरराष्ट्रीय कुस्ती महादंगल आयोजित करण्यात आली आहे. या मैदानासाठी आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक मानांकन असलेले टेडोरे लेब्नॉईझे व जार्जी स्कॅन्डेलिडझे हे जॉर्जीयाचे दोन मल्ल मैदानात खेळणार आहेत. त्यामुळे यंदाचे देशातील सर्वात मोठे कुस्ती मैदान विट्यात होत आहे. कुस्ती क्षेत्रात देशाचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचविणारे ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै. विजय चौधरी, कॉमनवेल्थ गेम्सचा सुवर्णपदक विजेता पै. नरसिंग यादव व कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेता पै.राहुल आवारे हे तीन डीवायएसपी एकाच आखाडयात उतरण्याची ही देशातील पहिलीच वेळ आहे. नुकतीच महाराष्ट्र केसरीची गदा पटकावलेला पै. बाला रफीक शेख हा महाराष्ट्र केसरीचा बहुमान पटकाविल्यानंतर पहिल्यांदाच आंतरराष्ट्रीय मल्लाशी या मैदानात लढत देणार आहे. त्यामुळे या आंतरराष्ट्रीय कुस्ती मैदानाकडे संपुर्ण राज्यभरातील कुस्तीशौकीनांचे लक्ष लागले असून हे यंदाचे देशातील सर्वात मोठे मैदान आहे, अशी माहिती निमंत्रक डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी विटा नगरपालिकेचे नगरसेवक अमोल बाबर, मैदानाचे संयोजक अभिजीत पवार, किरण पाटील, सुरेश शिंदे, दिलीप किर्दत, बालेखान मुलाणी, उत्तम पवार, सतिश निकम उपस्थित होते.

विटयात 7 जानेवारीला भारत विरूध्द जॉर्जीया आंतरराष्ट्रीय कुस्तीची महादंगल यंदाचे देशातील सर्वात मोठे मैदान ; डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांची माहिती
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *