पुणे

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे कोल्हापूर संघाला विजेतेपद

प्रतिनिधी
Dec 31 / 2018

पुणे : महावितरणच्या आंतरपरिमंडलीय राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत कोल्हापूर संघाने वर्चस्व गाजवून सर्वसाधारण विजेतेपदाचा सलग दुसर्‍यांदा मान मिळविला. प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्याहस्ते विजेत्या संघाला करंडक प्रदान करण्यात आला. स्वारगेट येथील कै. बाबुराव सणस क्रीडांगणावर शनिवारी तीन दिवसीय स्पर्धेचा समारोप झाला. सर्वाधिक 38 गुण मिळविणाऱ्या कोल्हापूर संघाने सर्वसाधारण विजेतेपदाचा करंडक पटकाविला. महावितरणचे प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांच्याहस्ते हा करंडक कोल्हापूर संघाला प्रदान करण्यात आला. यावेळी इतर संघ व उपस्थितांनी सुद्धा टाळ्यांचा गजर व जल्लोष करीत कोल्हापूर संघाचे कौतुक केले. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून स्पर्धेचे मुख्य समन्वयक व मुख्य अभियंता सचिन तालेवार (पुणे), अनिल भोसले (कोल्हापूर),सुनील पावडे (बारामती), भूजंग खंदारे (मुख्यालय), शंकर तायडे (गुणवत्ता नियंत्रण) अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे, राजेंद्र पवार, पंकज तगलपल्लेवार, अंकुर कावळे, भाऊसाहेब इवरे, वादिराज जहागिरदार यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. पाहुण्यांच्या हस्ते स्पर्धेत सांघिक व वैयक्तिक खेळातील विजेत्या व उपविजेत्यांना सुवर्ण व रौप्यपदक तसेच प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कमलाकर चौधरी व मृदुला शिवदे यांनी केले तसेच सारिका सातपुते यांनी आभार मानले.

महावितरणच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेचे कोल्हापूर संघाला विजेतेपद
Categories : पुणे Tags : पुणे
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *