सांगली

विट्यात 1 जानेवारीला स्वच्छ मॅरेथॉन स्पर्धा अ‍ॅड. वैभव पाटील यांची माहिती

प्रतिनिधी
Dec 31 / 2018

विटा / प्रतिनिधी: स्वच्छ सर्वेक्षण 2019 अभियानांतर्गत विटा नगरपालिकेच्यावतीने नववर्षानिमित्त मंगळवार दि. 1 जानेवारी 2019 रोजी स्वच्छ विटा मॅरेथॉन - 2019 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत एक हजार धावपटू सहभागी होणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अ‍ॅड. वैभव पाटील व मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अ‍ॅॅड. वैभव पाटील म्हणाले, स्वच्छ सर्वेक्षण 2019 स्पर्धेला 4 जानेवारीपासून सुरवात होत आहे. या स्पर्धेसाठी आम्ही सर्व विटेकर तयार आहोत, हे दाखविण्यासाठी आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यासाठी नववर्षानिमित्त मंगळवार दि. 1 जानेवारी 2019 रोजी स्वच्छ विटा मॅरेथॉन - 2019 या स्पर्धेचे आयोजन केले आहे. तर डायमंड कल्चरल ग्रुपच्यावतीने खासदार महोत्सवानिमित्त 1 जानेवारी 2019 रोजी सकाळी नऊ वाजता स्वच्छ भारत व रस्ता सुरक्षा सप्ताहनिमित्त प्रबोधन सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्याधिकारी महेश रोकडे म्हणाले, या मॅरेथॉन स्पर्धेचे सहप्रायोजक एचडीएफसी बँक आहे. त्यांचे या स्पर्धेसाठी सहकार्य लाभले आहे. या स्पर्धेत सहभागी होणार्‍या स्पर्धकांसाठी जर्शी व कॅप तयार केलेली आहे. मंगळवार दि. 1 जानेवारी 2019 रोजी सकाळी लोकनेते हणमंतराव पाटील प्राथमिक शाळा नं. 2 पासून या मॅरेथॉनला सुरवात होणार आहे. छत्रपती शिवाजीमहाराज चौक - सांगली रोड - मारूतीमंदिर - आडवीपेठ - जैनमंदिर - दत्तमंदिर - गणपती मंदिरमार्गे - कराड रोड- क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा - मॉडर्न एज्युकेशन सोसायटी - संगम मेडिकल - मायणी रोड - वनविभाग कार्यालयमार्गे - लिलाताई देशचौगुले विद्यामंदिर - सावरकरनगर - स्पंदन हॉस्पिटल - खानापूर रोड - बाजार समिती - शासकीय विश्रामगृह - बसस्थानक - शिवाजी चौक - पंचमुखी गणपती मंदिरमार्गे नगरपालिकेच्या खुल्या नाट्यगृहात या मॅरेथॉन स्पर्धेचा समारोप होईल. समारोपच्या ठिकाणी सेल्फीपॉईंट उभारण्यात येणार आहे. यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण तारळेकर, एचडीएफसी बँकेचे मॅनेजर संजय मोहिते, प्रतीक सुर्वे, नगरसेवक रविदादा कदम, ज्ञानेश्‍वर शिंदे, रोहित पाटील, आरोग्य विभागाचे प्रमुख आनंदा सावंत, नितीन चंदनशिवे, सचिन लोंढे उपस्थित होते.

विट्यात 1 जानेवारीला स्वच्छ मॅरेथॉन स्पर्धा अ‍ॅड. वैभव पाटील यांची माहिती
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *