दैनिक राशिभविष्य

राशी भविष्य ३० सप्टेंबर २०१६

प्रतिनिधी
Apr 13 / 2018

मेष : मित्रांचे सहकार्य मिळाल्याने महत्त्वाची कार्य पूर्ण होतील. आरोग्य उत्तम राहील. मान-सन्मानात वाढ होईल.

 


वृषभ : सामाजिक संबंध आपणास सन्माननीय लोकांच्या संपर्कात आणतील. एका आनंददायी संध्याकाळबद्दलची आपली योजना यशस्वी होणे शक्य आहे.

 

मिथुन : एखाद्या दीर्घ मुदतीचे वचन देण्यापूर्वी नीट विचार करा. आपल्या कार्यात येणारे विघ्न आपल्या मनावरील ताणाचे कारण बनू शकतात.

 

कर्क : आपणास काही नवीन संधी मिळू शकतात ज्यांनी भविष्यात आपणास यश मिळणे शक्य आहे.

 

सिंह : कामात विलंब झाला तरी यश मिळेल. नोकरीपेशा व्यक्तिंनी सहयोग घेऊन पुढे जावे. निरुपयोगी गोष्टींवर लक्ष देऊ नये. आरोग्य चांगले राहील.

 

कन्या : शोधकार्यात यश मिळेल. आर्थिक प्रश्नांचा निदान होईल. मित्रांच्या सहयोगाने यश मिळेल. पत्नीचा सहयोग घेऊन चला.

 


तूळ : व्यवसाय निर्विघ्नपणे चालण्याची शक्यता आहे. कौटुंबिक सभासदांकडून मदत मिळेल. आनंद आणि मनोरंजनसाठी देखील वेळ मिळण्याची शक्यता आहे.

 


वृश्चिक : आपल्या दृष्टीकोणात विधायक परिवर्तन केल्याने आपणास निश्चितच यश मिळेल. आपल्या मुक्कामापर्यंत पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम आणि धैर्याची आवश्यकता आहे.

 

धनु : मानसिक सुख-शांतीचे वातावरण राहील. अनुकूल वार्ता मिळतील. नोकरीपेशा व्यक्तींसाठी उत्तम काळ आहे. मान-सन्मान वाढेल. आनंदाची बातमी मिळेल.

 


मकर : आरोग्याची काळजी घ्या. कौटुंबिक वाद-विवाद टाळा. मिळकतीपेक्षा अधिक खर्च होईल. पत्नीच्या आरोग्याची चिंता राहील. आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवा.

 


कुंभ : सामाजिक कार्य काळजीपूर्वक करा. व्यापार-व्यवसायात जोखीमीचे कार्ये टाळा. नोकरीपेशा व्यक्ती कामात व्यस्त राहातील.

 


मीन : संपत्ती संबंधी विषयांमध्ये अनुकूल स्थिती उत्पन्न होण्याची संभावना. कौटुंबिक वातावरण देखील आपल्या जीवनात आनंद आणेल. आपल्या जोडीदाराशी संवाद मधुर ठेवा.

 

श्री. संतोष बाळासाहेब गिरी गोसावी,महाराज

अंकशास्त्र । वास्तुशास्त्र । रमलशास्त्र । होराशास्त्र । हस्तसामुद्रिकशास्त्र भाग्यांक ज्योतिष व वास्तुशास्त्र सल्ला केंद्र,

श्री एक मुखी दत्त मंदिर ,१०८६ बि वॉर्ड मंगळवार पेठ मिरजकर टीकटी  कोल्हापूर .मो०९७६६३५४४८३

राशी भविष्य ३० सप्टेंबर २०१६
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *