कोल्हापूर

सात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल

प्रतिनिधी
Sep 30 / 2018

शाहीवाडी प्रतिनिधी (दि. ३०) अल्पवयीन मुलीशी लैंगिक चाळे करणाऱ्या तानाजी नामदेव शिंदे (कांडवण ता. शाहूवाडी) या युवकाविरोधात लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार शाहूवाडी पोलिसांत रविवारी गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांतून मिळालेल्या माहितीनुसार, कांडवण पैकी कांबळेवाडी (ता. शाहूवाडी) येथे शनिवारी (ता.२९) रोजी सायंकाळी साडे पाचच्या सुमारास घराशेजारी खेळणाऱ्या सात वर्षीय अल्पवयीन मुलीला उचलून नेऊन तानाजी नामदेव शिंदे या संशयित आरोपीने कांडवण ते कांडवण पैकी कांबळेवाडी दरम्यानच्या रस्त्यालगत ऊसाच्या शेतात तिच्याशी जबरदस्तीने लैंगिक चाळे केले. यानंतर भेदरलेल्या पीडित मुलीने घटनेची माहिती आपल्या घरी सांगणार म्हंटल्यावर हा संशयित नराधम युवक घटनास्थळावरून पसार झाला. त्याचवेळी आपल्या घरी परतल्यावर पीडित बलिकेने आईला घडलेला प्रकार सांगितला. पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी (ता.३०) तानाजी नामदेव शिंदे विरोधात शाहूवाडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खळबळजनक घटनेने कांडवण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून उपविभागीय पोलीस अधिकारी आर. आर. पाटील, पोलीस निरीक्षक मनोहर रानमाळे यांनी घटनास्थळी भेट देत दलित समाजातील प्रकाश कांबळे, श्रीकांत कांबळे, रमेश चांदणे, संतोष कांबळे, मानसिंग कांबळे व इतर २५ ते ३० कार्यकर्ते तसेच कांडवण गांवचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील व ग्रामस्थ यांची सलोखा बैठक घेतली. यावेळी गुन्ह्याच्या अनुषंगाने योग्य प्रकारे तपास केला जाईल यासाठी गावांत कायदा, सुव्यवस्था राखून प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी केले. खैरलांजी प्रकरणास बारा वर्षे पूर्ण होत असतानाच पुरोगामी महाराष्ट्रात आजही मागासवर्गीयांवर होणारे अन्याय काही केल्या कमी होत नसल्याचे यावरून सिद्ध होत आहे.

सात वर्षाच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार प्रकरणी शाहूवाडी पोलिसांत तानाजी नामदेव शिंदे या युवकाविरोधात गुन्हा दाखल
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *