सातारा

गरीब रुग्णांना निशुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण

प्रतिनिधी
Sep 24 / 2018

रत्नागिरी दि.२३ जिमाका) :- गरीब रुग्णांना निशुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी या उद्देशाने आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही योजना शासनाने आणली आहे, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले. शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना उद्घाटन प्रसंगी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. प्रल्हाद देवकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुध्द आठल्येआयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनचे श्रृषिकेश धावणळकर, वैद्यकीय समन्वयक डॉ. प्रतिभा चव्हाण, जिल्हा वैद्यकीय अधीक्षक डॉ. योगेश खेडेकर, डॉ. मोरे, डॉ. पाखरे आदि मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले याआधी शासनाकडून महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना राबविण्यात येत होती ज्यामध्ये गरीबांना ९७१ प्रकारच्या आजारांवर १ लाख ५० हजाराच्या मर्यादेत निशुल्क सेवा देण्यात येत होती. आता आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत ११२२ आजारांवर ५ लाखांच्या मर्यादेत लाभार्थ्यांना निशुल्क उपचार घेता येणार आहे. आता या दोन्ही योजना एकत्रित राबविण्यात येणार आहेत. सामाजिक, आर्थिक व जातनिहाय गणनेच्या आधारे ग्रामीण भागामध्ये घर नसलेली कुटुंब, भिक्षूक, स्वच्छता कर्मी, कंत्राटी कर्मचारी, कचरा वेचक कुंटुंब आदि तसेच शहरी भागातील फेरीवाले, बांधकाम कामगार, प्लंबर,गवंडी, रंगकाम करणारे, माळीकाम करणारे, मदतनीस, सायकल रिक्षा ओढणारे आदि लाभार्थींना या योजनाचा लाभ घेता येणार आहे. गरिबांपर्यत आरोग्य सेवा पोहचविणे हा शासनाचा उद्देश आहे. आजार होवू नये यासाठी आपण प्रयत्न करत असतो त्यातून दूरदैव्याने आजार झालाच तर समाजातील गरीब जनतेला या योजनाचा फायदा होणार आहे असेही ते म्हणाले. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले देशातील जनता सुदृढ राहावी, त्यांचे आरोग्य चांगलं राहव हा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राबविण्यामागे शासनाचा महत्वाचा उद्देश आहे. शासकीय रुग्णालयात जवेढे लाभार्थी येणार तेवढया सगळयांना या योजनेचा लाभ मिळणार आहे, त्यामुळे ही योजना जिल्हयातील तळागळातील जनतेपर्यंत पोहचविणे गरजेच आहे त्यासाठी मोठया प्रमाणावर प्रचार प्रसार करणे आवश्यक आहे. यावेळी मानसी रेवाळे, निलिमा देसाई आदि लाभार्थ्यांना गोल्डन ई-कार्डचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

गरीब रुग्णांना निशुल्क गुणात्मक वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना -जिल्हाधिकारी सुनील चव्हाण
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *