सातारा

जनताच तुमचे विसर्जन करेल;आ. शिवेंद्रराजे

प्रतिनिधी
Sep 19 / 2018

सातारा:- आ. शिवेंद्रराजे यांनी खा. उदयनराजे यांच्यावर जोरदारपणे टीका केली,ज्या पालिकेत तुमची एकहाती सत्ता आहे, त्याच पालिका प्रशासनाने न्यायालयाचे आदेश पाळण्याचा निर्णय घेतला असून, त्या आदेशाप्रमाणे मंगळवार तळ्यात विसर्जन करण्यास पालिकेनेही बंदी घातली आहे. जास्त फुशारक्या मारू नका. कारण, सातारा पालिकेनेच तुमचे नाक कापले आहे असे आ. शिवेंद्रराजे म्हणाले.दरम्यान, मला माझी पायरी चांगलीच ठाऊक आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या पायर्‍या मोजा. बाप्पांचे विसर्जन मंगळवार तळ्यात होऊ शकले नाही. पण, तुमच्या विसर्जनाची वेळ आता जवळ आली आहे. लवकरच जनताच तुमचे विसर्जन करेल, असा इशाराही आ. शिवेंद्रराजे यांनी दिला आहे.

जनताच तुमचे विसर्जन करेल;आ. शिवेंद्रराजे
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *