थोडक्यात महत्वाचे

आता गुगल मधून सुद्धा होणार कर्मचारी कपात

John Smith
Nov 24 / 2022

मेटा फेसबुक, अमेझोन, ट्विटर, पाठोपाठ आता गुगल सुद्धा कर्मचारी कपात करणार असल्याचे वृत्त आहे. गुगलची पेरेंट कंपनी अल्फाबेट १० हजार कर्मचार्यांना घरी पाठवायच्या तयारीत असून त्याची योजना तयार केली गेली आहे. अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी काही दिवसांपूर्वी कर्मचारी कपातीचे संकेत एका कार्यक्रमात बोलताना दिले होते. एका रिपोर्ट नुसार बिग टेक कंपन्या जागतिक आर्थिक परिस्थितीचा मागोवा घेऊन एकूण वर्क फोर्स पैकी ६ टक्के वर्कफोर्स कमी करणार आहेत. पैकी तीन टॉप रँकच्या कंपन्या ट्विटर, फेसबुक आणि अमेझोनने गेल्या काही आठवड्यात मोठी नोकर कपात केली आहे. अल्फाबेटने सुद्धा या संदर्भात योजना तयार केली आहे. द इन्फर्मेशनच्या रिपोर्ट नुसार गुगल नवे रँकिंग व पर्फोर्मंस इम्प्रूव्हमेंट प्लॅन बनवत आहे.

आता गुगल मधून सुद्धा होणार कर्मचारी कपात
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *