क्रीडा

फिफा फुटबॉल विश्वचषक; जपानचा जर्मनीवर 2-1 ने रोमहर्षक विजय

John Smith
Nov 23 / 2022

फीफा रँकिंगमध्ये 11 व्या स्थानी असणाऱ्या जर्मनीला 24 व्या स्थानावरील जपान संघाने 2-1 ने मात दिली आहे. विशेष म्हणजे 74 मिनिटांपर्यंत जर्मनीचा संघ 1-0 ने आघाडीवर होता पण 75 आणि लगेचच 83 व्या मिनिटाला जपानने गोल करत एका रोमहर्षक विजयाची नोंद केली आहे. विशेष म्हणजे अर्जेंटिना संघाला ज्याप्रकारे सौदी अरेबियाने 2-1 ने मात दिली, तसाच काहीसा सामना आज पाहायला मिळाला. त्या अर्जेटिंनाप्रमाणे जर्मनीनेही हाल्फ टाईमपूर्वी पेनल्टीच्या मदतीनं गोल केला होता. तर हाल्फ टाईमनंतर सौदीप्रमाणं जपाननं दोन गोल करत विजय मिळवला. सामन्याचा विचार करता सामना सुरु होण्यापूर्वी जर्मनीचा यंदाचा स्कॉड पाहता ते सहज सामना जिंकतील असं वाटत होतं. त्यांनी सुरुवातीपासून चांगली पकड बनवली होती.

फिफा फुटबॉल विश्वचषक; जपानचा जर्मनीवर 2-1 ने रोमहर्षक विजय
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *