महत्वाच्या घडामोडी

ग्रॅच्युईटीच्या नियमांमध्ये बदल: केंद्र सरकार नोकरदार वर्गासाठी घेणार महत्वाचा निर्णय

John Smith
Jun 26 / 2020

केंद्र सरकार नोकरदार वर्गासाठी मोठा दिलासादायक निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. यानुसार सरकार ग्रॅच्युईटीमध्ये (New rules of Gratuity) मोठे बदल करणार आहे. सध्या पाच वर्षे सलग एकाच कंपनीत काम केल्यास कंपनी सोडतेवेळी ग्रॅच्युईटी दिली जाते. आता हा कालावधी एक वर्षावर आणण्याचा विचार सुरु आहे.

ग्रॅच्युईटीच्या नियमांमध्ये बदल झाल्यास एक वर्ष काम केल्यानंतर नोकरदार वर्ग कंपनीतून ग्रॅच्युईटीचा पैसा काढू शकणार आहेत. मोदी सरकार यावरही विचार करत आहे की, ठरविलेल्या काळा साठी काम करणाऱ्या लोकांनाही ग्रॅच्युईटीच्या नियमंमध्ये ठेवले जावे. असे झाल्यास 11 किंवा 12 महिन्यांच्या कंत्राटावर असलेले कर्मचारीही या नव्या नियमांनुसार ग्रॅच्युईटीचे लाभार्थी असणार आहेत. मात्र, अद्याप याबाबत काहीच स्पष्टीकरण देण्यात आलेले नाहीय. कारण याबाबतचे नियम कधी बनविण्यात येतील आमि कधी याची घोषणा केली जाईल याची कल्पना देण्यात आलेली नाहीय. हे नियम झाल्यास याचा करोडे नोकरवर्गाला फायदा होणार आहे. सरकारचा प्रयत्न आहे की, ग्रॅच्युईटीलाही पीएफ फंडासारखे बनविले जावे. म्हणजेच नोकरी बदलल्यास दुसऱ्या कंपनीच्या खात्यामध्ये ही ग्रॅच्युईटी वळती करता येईल. जसे की आता पीएफमध्ये केले जाते. यामुळे संपूर्ण ग्रॅच्युईटीच्या स्ट्रक्चरमध्येच बदल केला जाण्याची शक्यता आहे. ज्य़ा प्रमाणे पीएफच्या खात्यामध्ये दर महिन्याला एक ठराविक रक्कम टाकली जाते, त्याचप्रमाणे ग्रॅच्युईटीमधेही सोय करण्यात येणार आहे. यासाठी योजना बनविण्यात येत आहे. तसेच ग्रॅच्युईटीला अधिकृतरित्या सीटीसीमध्ये टाकण्यासाठीही प्रस्ताव येण्याची शक्यता आहे. यावर कामगार मंत्रालय काम करत आहे. तसेच कर्मचारी संघटनांशी यावर चर्चा केली जात आहे.

ग्रॅच्युईटीच्या नियमांमध्ये बदल: केंद्र सरकार नोकरदार वर्गासाठी घेणार महत्वाचा निर्णय
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *