महत्वाच्या घडामोडी

फेअर अ‍ॅण्ड लव्हलीच्या निर्णयाने सोनाली कुलकर्णी झाली खुश.....

John Smith
Jun 25 / 2020

सौंदर्याचा संबंध थेट गोरेपणाशी जोडला गेला आणि आपणही गोरं दिसायला हवे, यासाठी महिलाच काय तर पुरूषही धडपडायला लागले. अशात बाजारात एक ना अनेक फेअरनेस क्रिम विक्रीला आलेत. गोरं होण्याच्या हव्यासापोटी या फेअरनेस क्रिमकडे लोकांचा कल वाढला. अशात एक ब्रँड गावोगावी लोकप्रिय झाला, तो म्हणजे फेअर अ‍ॅण्ड लव्हली. आता मात्र या ब्रँडने आपल्या नावातील ‘फेअर’ हा शब्द काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. ब्रँडच्या या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. मराठमोळी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिचा आनंद तर गगणात मावेनासा झाला आहे.

फेअर अ‍ॅण्ड लव्हलीने आपल्या नावातून ‘फेअर’ हा शब्द गाळण्याचा निर्णय घेतल्याने मला खूप आनंद झाला आहे.आपण आशिया खंडात राहतो, आपण भारतात राहतो. आपल्या मातीशी, आपल्या हवामानाशी नातं सांगणारा आपला रंग किंवा आपला वर्ण आहे. आपल्याला सगळ्यांना विदेशी गोरेपणाचे प्रचंड आकर्षण असल्यामुळे गेली अनेक वर्षे आपण आपल्या रंगाला नाकारतो आहे. हे म्हणजे स्वत:ला आपण नाकारण्यासारखे आहे. आता याला आळा बसेल आणि आता आपण स्वत:ला स्वीकारू, याचा विशेष आनंद आहे.नाटक-सिनेमांमध्ये आम्हाला आमच्या वर्णामुळे समस्या आली, असे मला तरी जाणवले नाही. उलट इंटरनॅशनल सिनेमामध्ये भारतीय वर्ण सेलिब्रेट केला जातो . चांगले मेअकप आर्टिस्ट मेकअप करताना नो मेअकप लूप यावा यासाठी एक शेड डार्कर बेस करतात. लॉकडाऊनमध्ये एचयूएलच्या ज्या टीमने इतका सकारात्मक विचार केला, हे कौतुकास्पद आहे. विशिष्ट रंग म्हणजेच सौंदर्य, ही संकल्पना यातून पुसली जाईल. आता फेअर हा शब्द काढून टाकल्याने तो कॉम्प्लेक्स नक्कीच निवळेल अशी आशा आपण करूया.

फेअर अ‍ॅण्ड लव्हलीच्या निर्णयाने सोनाली कुलकर्णी झाली खुश.....
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *