महत्वाच्या घडामोडी

माहेरची आणि सासरची नाळ जोडणारी कुसुम

MahaNews LIVE
Oct 05 / 2021

हिंदी टेलिव्हिजन क्षेत्रात प्रदीर्घ काळ लोकप्रियतेच्या शिखरावर पोचलेली बालाजी टेलिफिल्म्सची कुसुम आता मराठीतही रिमेक घेऊन सोनी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. या मालिकेत महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री शिवानी बावकर या मालिकेत मुख्य भूमिकेत आहे. शिवानी ही प्रसिद्ध अभिनेत्री असून आपल्या शीतली या व्यक्तिरेखेमुळे ती महाराष्ट्राच्या घराघरांत ओळखली जाते. सासर आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या मुलीच्या भूमिकेत शिवानी दिसत आहे. आपल्या आईवडिलांसाठी, आपल्या कुटुंबासाठी सतत तत्पर असलेली आणि माहेर अशा दोन्ही जबाबदाऱ्या पेलणारी कुसुम सोनी मराठीवर भेटीला आली आहे . सासर जोडायला माहेरची नाळ तोडायची काय गरज, असा सगळ्या मुलींच्या मनातला प्रश्न या मालिकेतून मांडण्यात आला आहे. दुनियेसाठी खपायचं आणि आईबापाला नाही जपायचं, असं कसं चालेल, असं म्हणत कुसुम सगळ्या जबाबदाऱ्या उत्तम पद्धतीने पार पाडताना दिसत आहे कुसुम आताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचं प्रतिनिधित्व करत आहे . ज्या मुलींना आपल्या कुटुंबासाठी काही करायचं आहे त्या सगळ्यांना या मालिकेतून नक्कीच प्रेरणा मिळेल. सर्वच मुलींच्या मनातला प्रश्न तिनी यात बोलून दाखवला आहे. आणि म्हणूनच कुसुम तुमच्या-आमच्यातली एक वाटते. या मालिकेबद्दल शिवानी म्हणाली की आत्तापर्यंत विविध भूमिका माझ्या वाट्याला आल्या लॉकडाऊननंतर काहीतरी दणदणीत प्रेक्षकांना देण्यासाठी मी उत्सुक होते अशातच कुसुम चा प्रस्ताव माझ्यासमोर आला . कुसुम हि तुमच्या आमच्या परिवारातीलच एक सदस्य आहे माहेरचा घर आणि सासरचं घर यामधील आपल्या जबाबदाऱ्या मोलाने तोलणाऱ्या तरुणीची हि कहाणी आहे .कुसुम हि नेहमी आधी दुसर्यांचा विचार करणारी आणि नंतर स्वतःचा विचार करणारी तरुणी आहे. कुसुम हि आत्ताच्या काळातील मुली किंवा स्त्रियांचे प्रतिनिधित्व करीत आहे . मी खूश आहे की बालाजी टेलिफिल्म्स ने मला इतकी मोठी संधी उपलब्ध करून दिली. या मालिकेबद्दल एकता कपूर म्हणाली की २१ वर्षानंतर कुसुम प्रेक्षकांच्या भेटीला पुन्हा आलो आहोत . मी खूप आनंदी आहे. सोनी मराठी वाहिनीवर प्रेक्षकांसमोर कुसुम आणण्याची संधी मला मिळाली. कुसुम ही मालिका मजा खूप जवळची आहे. मी मराठीमध्ये याआधीही काम केले आहे, पण खूप काळानंतर मी मराठीमध्ये पुन्हा पदार्पण केला आहे . प्रादेशिक भाषेमध्ये आणि खासकरून मराठीमध्ये खूप एक्सप्लोर करण्यासारखे आहे. आणि मी खूश आहे की सोनी मराठी वाहिनीने मला ही संधी दिली. पाहायला विसरू नका कुसुम सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वा. फक्त सोनी मराठी वाहिनीवर

माहेरची आणि सासरची नाळ जोडणारी कुसुम
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *