महत्वाच्या घडामोडी

अरुण नरके फौंडेशन’ने विकसित केली इंटरनेटविना ई-लर्निंग प्रणाली घरबसल्या करता येणार एमपीएससीची तयारी

MahaNews LIVE
Oct 01 / 2021

अरुण नरके फौंडेशन ही दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर कर्नाटकातील सीमा भागात सामाजिक बांधिलकीतून समाजातील विविध क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे. गेली २७ वर्षे शिक्षण,क्रीडा,कला,आरोग्य, पर्यावरण, पर्यटन महिला सबलीकरण, कौशल्य विकास कार्यक्रम अशा विविध आघाडीवर राबवल्या जाणाऱ्या फौंडेशनच्या सेवेचा आजवर सात लाखाहून अधिक लाभार्थींनी लाभ घेतला आहे. आणि अनेकांच्या जीवनाला दिशा मिळाली आहे. या सर्व उपक्रमातील सर्वात प्रभावी अशा राज्यातील प्रमुख आणि नामवंत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण केंद्रात अरुण नरके फौंडेशनचे नाव घेतले जाते. या प्रशिक्षण केंद्रातून सामान्य शेतकरी कुटुंबातील, शहरी व ग्रामीण भागातील ५००० हून अधिक विद्यार्थ्यांनी प्रशासकीय सेवेत जाण्याचे आपले ध्येय साकारले आहे ग्रामीण भागातील विद्यार्थांच्या, इंटरनेटच्या तांत्रिक व मोबाईल इंटरनेट रिचार्जच्या आर्थिक अडचणी लक्षात घेऊन संस्थेने इंटरनेट विना ई–लर्निग प्रणाली विकसित करून जास्तीत जास्त ग्रामीण विद्यार्थांना स्पर्धा परीक्षा कोर्सेसचा लाभ घेता यावा यासाठी सद्याची ई–लर्निग प्रणाली मोबाईल SD-Card(मेमरी कार्ड) मध्ये विकसित करण्यात आली आहे, यामुळे विद्यार्थांना आता कधीही, कुठेही , केव्हाही इंटरनेटशिवाय घरबसल्या स्पर्धा परीक्षांची परिपूर्ण तयारी करण सोप जाणार आहे त्यामुळे विद्यार्थी ,महिला , गृहिणी व नोकरदार विद्यार्थांना आता घरापासून दूर शहरात जाऊन रूमभाडे, मेसच्या जेवणाचे तसेच प्रवासाचे आर्थिक टेन्शन कमी होणार आहे,

अरुण नरके फौंडेशन’ने विकसित केली इंटरनेटविना ई-लर्निंग प्रणाली घरबसल्या करता येणार एमपीएससीची तयारी
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *