महत्वाच्या घडामोडी

पाटण तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा

MahaNews LIVE
Sep 23 / 2021

पाटण | ठाणे येथे स्थापन झालेल्या कालिकाई व संपर्क ॲग्रो मल्टिस्टेट को. ऑ. सो. या मल्टिस्टेट कंपनीने मुंबई, ठाणे, कोकण पश्चिम महाराष्ट्रसह पाटण तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घातल्याचे पुढे आले आहे. या फसवणूक प्रकरणी गुंतवणूक प्रतिनिधी सुमा गौतम माने (रा. कडवे ता. पाटण) व सुनिल तुकाराम कदम (रा. पाटण) यांनी कंपनीचे संचालक मंडळा विरोधात जिल्हा पोलिस प्रमुख सातारा व पोलिस स्टेशन पाटण येथे तक्रार दाखल केली असून या तक्रारीची दखल जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी घेतली असून पुढील कारवाईचे आदेश अर्थिक गुन्हे अन्वेषण शाखा सातारा यांना केले आहेत. या बाबत श्रीमती सुमा गौतम माने यांनी दिलेल्या तक्रारीत पुढे म्हणल्या आहेत की, कालिकाई इंडस्ट्रीज इंडिया लि. आणि संपर्क अॅग्रो मल्टीस्टेट को. ऑपरिटिव्ह सोसायटी लि. ठाणे या एकच फर्म असलेल्या कंपनीने ग्रामीण भागातील गोरगरीब लोकाना अर्थिक गुंतवणूकीच्या दीडपट डबल, तिप्पट परतावा देण्याचे अमिष दाखवून या कंपनीचे जितेंद्र रामचंद्र यादव (रा. केर ता. पाटण जि. सातारा, सध्या- मुंबई) व महिपती गोविंद जगदाळे (रा. पाटण ता. पाटण जि. सातारा) याच्या मार्फत पाटण येथे ऑक्टोंबर 2012 पासून ते 218 अखेर आर्थिक गुंतवणूकीचा व्यवसाय सुरु केला. यामध्ये कंपनीने तीन वर्ष, पाच वर्ष, सात वर्ष, नऊ वर्ष मुदत्तीवर आर्थिक गुंतवणूकीसाठी लोकांचा विश्वास संपादन करून रोख रक्कम गोळा करण्यास सुरुवात केली.

पाटण तालुक्यातील हजारो गुंतवणूकदारांना कोट्यावधींचा गंडा
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *