महत्वाच्या घडामोडी

सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम प्रवेशाची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढविली

MahaNews LIVE
Sep 23 / 2021

कोल्हापूर ः नाशिक येथील यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या सहकार व्यवस्थापन पदविका (डीसीएम) व सहकार व्यवस्थापन पदविका (बँकिंग) या अभ्यासक्रमांसाठी सन 2021-22 या शैक्षणिक वर्षाकरिता प्रवेश घेण्याची मुदत आता 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढविण्यात आली आहे. दक्षिण-पश्चिम महाराष्ट्र व कोकण आणि उत्तर कर्नाटक परिसरात या अभ्यासक्रमांचे केंद्र केवळ ‘दिलासा सामाजिक विश्वस्त संस्था’ येथे आहे. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटवर जाऊन तेथे सहकार व्यवस्थापन पदविका (डीसीएम) संकेतांक पी-08 या अभ्यासक्रमासाठी सहकारी बँक, पतसंस्था तसेच सहकारी संस्थांमधील कर्मचारी ऑनलाईन प्रवेश अर्ज भरू शकतात. ज्यांनी पी-08 अभ्यासक्रम पूर्ण केला आहे व जे सहकार व्यवस्थापन पदविका (बँकिंग) म्हणजेच संकेतांक पी-52 हा अभ्यासक्रम पूर्ण करू इच्छितात तेही त्या अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल करू शकतात. ऑनलाईन अर्ज भरल्यावर संबंधितांनी कोल्हापुरात शास्त्रीनगर परिसरातील डॉ. मगदूम हॉस्पिटलशेजारी असलेल्या दिलासा सामाजिक विश्वस्त संस्थेमध्ये येऊन तेथील अर्जही शुल्कासह भरणे आवश्यक आहे. यापूर्वी प्रवेशाची मुदत ऑगस्ट 2021 अखेर होती, पण आता ही मुदत वाढवून 30 सप्टेंबर पर्यंत करण्यात आली आहे, या संधीचा फायदा इच्छुक विद्यार्थ्यांनी तातडीने घ्यावा आणि अभ्यासक्रमांसाठीचा आपला प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन दिलासा सामाजिक विश्वस्त संस्थेच्या अध्यक्षा व केंद्रसंयोजक प्रा. डॉ. रूपा शहा यांनी केले आहे. ऑनलाईन प्रवेश घेताना अभ्यासकेंद्राचे नाव म्हणून दिलासा सामाजिक विश्वस्त संस्था, कोल्हापूर हे नाव नोंदवून अभ्यासकेंद्र क्रमांक 71256 असे अभ्यासकेंद्रासंदर्भातील रकान्यात नोंदवणे आवश्यक आहे असेही प्रा. डॉ. शहा यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

सहकार व्यवस्थापन पदविका अभ्यासक्रम प्रवेशाची मुदत 30 सप्टेंबर पर्यंत वाढविली
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *