कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठाची मुख्य अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली

MahaNews LIVE
Sep 23 / 2021

कोल्हापूर (प्रतिनिधी) : शिवाजी विद्यापीठाच्या बॅ. बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्रोत केंद्रातर्फे मुख्य अभ्यासिका आणि स्टडी सेंटर आज (बुधवार) पासून ५० टक्के उपस्थिती आणि कोविडच्या नियमांचे पालन करून विद्यार्थ्यांसाठी खुल्या करण्यात येत आहेत. असे संचालक डॉ. नमिता खोत यांनी कळविले आहे. सकाळी १०.३० ते सायंकाळी ६.०० वा. पर्यंत अशा कार्यालयीन वेळेत अभ्यासिका खुल्या राहतील. अभ्यासिकेत बसू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडे कोविड प्रतिबंधक लसीकरणाच्या दोन मात्रा पूर्ण होऊन चौदा दिवस झाल्याची प्रमाणपत्र सोबत असणे आवश्यक आहे. शैक्षणिक वर्षातील २०२०-२१ या वर्षातील प्रवेशित पदव्युत्तर विद्यार्थी, एम.फिल., पी.एच.डी. आणि संशोधक विद्यार्थ्यांकडे ज्ञानस्रोत केंद्राचे स्टडी सेंटर विभागाचे चालू वर्षीय ओळखपत्र असणे आवश्यक आहे. तसेच, कार्यालयीन सुट्टीदिवशी, प्रत्येक रविवारी, दुसरा व चौथा शनिवार दोन्ही अभ्यासिका पूर्णपणे बंद राहतील.

शिवाजी विद्यापीठाची मुख्य अभ्यासिका विद्यार्थ्यांसाठी खुली
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *