महत्वाच्या घडामोडी

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर, अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे

MahaNews LIVE
Sep 16 / 2021

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाची घोषणा करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची साईबाबा संस्थान अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे, तर जगदीश सावंत यांची उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. एकूण 12 जणांचे विश्वस्त मंडळ राज्य सरकारडून जाहीर करण्यात आले आहे. विश्वस्त मंडळात स्थानिकांना प्राधान्य देण्याची मागणी जोर धरु लागली होती. शिर्डीतून 50 टक्के विश्वस्त नेमण्याची मागणी होती. मात्र आजच्या यादीत 3 जणांना संधी देण्यात आली आहे. साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ आशुतोष काळे- अध्यक्ष, जगदीश सावंत- उपाध्यक्ष, अनुराधा आदिक- सदस्य सुहास आहेर- सदस्य अविनाश दंडवते- सदस्य सचिन गुजर- सदस्य राहुल कनल- सदस्य सुरेश वाबळे- सदस्य जयवंतराव जाधव- सदस्य महेंद्र शेळके- सदस्य एकनाथ गोंदकर- सदस्य शिर्डी नगर पंचायत अध्यक्ष (शिवाजी गोंदकर)- सदस्य

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ जाहीर, अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *