महत्वाच्या घडामोडी

साकीनाका प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी दिला फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचा आदेश

MahaNews LIVE
Sep 11 / 2021

मुंबईच्या साकीनाका परिसरामध्ये झालेल्या बलात्कार घटनेतील पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फास्ट ट्रॅकवर हा खटला चालवण्याचे आदेश दिले आहेत. महिलेवर बलात्कार होऊन नंतर तिचा मृत्यू होणे, हे माणुसकीला काळिमा फासणारे कृत्य असून गुन्हेगारास कठोर शिक्षा केली जाईल. यासंदर्भात मी राज्याच्या गृहमंत्र्यांशी देखील बोललो आहे, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिली आहे.

साकीनाका प्रकरणाची दखल घेत मुख्यमंत्र्यांनी दिला फास्ट ट्रॅकवर खटला चालवण्याचा आदेश
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *