महत्वाच्या घडामोडी

उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचा कोल्‍हापूर दौरा रद्‍द

MahaNews LIVE
Jul 26 / 2021

कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील पूरस्‍थितीची पाहणी करण्‍यासाठी उपमुख्‍यमंत्री अजित पवार येणार होते. पण खराब हवामानामुळे ते कोल्हापूरला येऊ शकणार नाहीत. आजचा नियोजित कोल्‍हापूर दौरा रद्‍द झाला आहे. सोमवारी सकाळी ते हेलिकॉप्‍टरने कोल्‍हापूरमध्‍ये येणार होते. मात्र साताऱ्यात जोरदार पाऊस सुरु आहे. खराब हवामानामुळे हेलिकॉप्‍टर टेक ऑफ होऊ शकले नाही. यानंतर ते रस्‍ते मार्गाने सांगली आणि त्‍यानंतर सोमवारी दुपारी कोल्‍हापूर जिल्‍ह्याचा दौरा करणार होते. पण त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द झाला आहे.

उपमुख्‍यमंत्री अजित पवार यांचा कोल्‍हापूर दौरा रद्‍द
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *