महत्वाच्या घडामोडी

कृषी कायद्यांच्या विरोधात राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत दाखल

MahaNews LIVE
Jul 26 / 2021

दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आंदोलन सुरु आहे. या आंदोलनाचा आवाज थेट संसदेपर्यंत पोहोचला आहे. विरोधी पक्ष शेतकरी कायद्यांच्या मुद्द्यांवरुन संसदेच्या पावसाळी अधिवेशनात सरकारवर सातत्यानं टीकेची झोड उठवत आहेत. अशातच आज काँग्रेसचे राहुल गांधी स्वतः ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले. राहुल गांधी जो ट्रॅक्टर चालवत संसदेत पोहोचले, त्यावर एक बॅनर लावण्यात आला होता. ज्यावर शेतकरी विरोधी तीन काळा कृषी कायदे मागे घ्या, मागे घ्या असं लिहिलं होतं.

कृषी कायद्यांच्या विरोधात राहुल गांधी ट्रॅक्टर चालवत संसदेत दाखल
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *