महत्वाच्या घडामोडी

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा

MahaNews LIVE
Jul 26 / 2021

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांनी राजीनामा दिला असल्याची माहिती मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कर्नाटकच्या मुख्यमंत्री पदाची कमान येडियुरप्पा यांच्याकडून काढून घेणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात होताना दिसत होत्या. अखेर आज येडियुरप्पा यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या आठवड्यात येडियुरप्पा यांनी दिल्लीत जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचीही भेटही घेतली होती. गेल्या बऱ्याच दिवसांपासून येडियुरप्पा राजीनामा देणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. भाजपच्या हायकमांडनं त्यांचं वय आणि प्रकृती लक्षात घेता त्यांचा राजीनामा मागितला असल्याचं बोललं जात होतं. मात्र काही दिवसांपूर्वी या वृत्ताबाबत बोलताना मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी नकार दिला होता. येडियुरप्पा यांनी आपल्या राजीनाम्याची अफवा असल्याचं म्हणत हे वृत्त खोटं असल्याचं म्हटलं होतं. पण अखेर आज त्यांनी राजीनामा दिला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा राजीनामा
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *