महत्वाच्या घडामोडी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला सांगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा

MahaNews LIVE
Jul 26 / 2021

सांगली : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा केला, यावेळी त्यांनी पुरग्रस्तांशी संवाद साधत त्यांच्या समस्या, अडचणी जाणून घेतल्या. ते म्हणाले की, भिलवडी परिसरातील ज्या भागातील घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा. वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थित असणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. राज्य सरकार प्रत्येक नागरीकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला सांगलीतील पूरग्रस्त भागाचा दौरा
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *