कोल्हापूर

पडळ प्राथमिक आरोग्य केंद्राची लसीकरणामध्ये उत्कृष्ट कामगिरी

MahaNews LIVE
Jun 29 / 2021

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जास्तीत जास्त लसीकरणावर भर देण्याचा प्रयत्न शासन करत आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील पडळ प्राथमिक आरोग्य केंद्र लसीकरणामध्ये उत्कृष्ट कामगिरी बजावत आहे. पडळ प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाचे कामकाज शासकीय नियमानुसार होत आहे. येथील आरोग्य कर्मचारीही लसीकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन लसीकरणाचे काम वेळेवर सुरु होण्यासाठी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहतात. या केंद्राचे वैद्यकीय अधिकारी हे आपल्या कामाचे चांगल्या पद्धतीने नियोजन करून रुग्णांना दिवस रात्र उत्कृष्ट आरोग्य सेवा देत आहेत. तसेच, रात्रीच्या वेळीहि उद्धवणाऱ्या तातडीच्या मदतीसाठी येथील अधिकारी आणि कर्मचारी कायमच तयार असतात. त्यामुळे या उत्कृष्ट कामकाजासाठी सर्व बाह्यरुग्ण तसेच भागातील सरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून या केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. रुपाली भिसे यांचे अभिनंदन होत आहे. तसेच द्वितीय वैद्यकीय अधिकारी डॉ एस एस नाईकरे, आरोग्य सहाय्यिका श्रीमती विद्या वडाम, श्रीमती जयश्री जाधव, उपकेंद्राचे सर्व समूह वैद्यकीय अधिकारी तसेच सुनील पोवार, अशोक टेपुगडे, आरोग्य सहाय्यक विनायक पाटील, श्रीमती राधा गवारी, लता बजंत्री, जयशिंग पोवार, अमोल कांबळे, श्रीमती विमल अतिग्रे, कविता घोरपडे, चिदंबर मगर, तात्या परीट, शंकर कुंभार, दीपक बाटे आणि उपकेंद्र सर्व आरोग्य सेविका हे आपले काम अगदी चोख पार पाडत असल्याने येथील नागरिकांमधून त्यांचे कौतुक होत आहे.

पडळ प्राथमिक आरोग्य केंद्राची लसीकरणामध्ये उत्कृष्ट कामगिरी
-
W

Your Mobile will not be published. Required fields are marked *